'टिकटॉक'कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यवधींची मदत

सारंकाही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी.... 

Updated: Apr 28, 2020, 02:23 PM IST
'टिकटॉक'कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यवधींची मदत  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई :  टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) सध्या सुरु असणाऱ्या कोरोना विषाणू विरोधातील लढ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. Coronavirus च्या या आव्हानाच्या प्रसंगी या कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटी रुपयांची मदत जमा केली आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही  या मदतीसाठी कंपनीचे आभार मानले.

टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून  कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. 

मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणिव असल्याचं ते या पत्राच्या माध्यमातून म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृहविभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहितीसुद्धा त्यांनी या पत्राद्वारे दिली. 

टिकटॉकचा वापर करणाऱ्यांपर्यंत कंपनीने यायपूर्वीच कोरोनासंदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवत जनजागृतीही केली आहे. कोविड १९शी सुरु असणाऱ्या या युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.  

 वैश्विक संटटाच्या या प्रंसंगी एक जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पावलं उचलली आहेत. 

तुम्हीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करू इच्छित असाल तर त्यासाठीची आवश्यक माहिती खालीलप्रमाणे....

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी- कोविड 19 बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720 स्टेट बँक ऑफ इंडिया
मुंबई मुख्य शाखा,
फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. या खात्यात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले आहे.