कुत्ता नही... ये तो फायर है! Video पाहून असंच म्हणाल; कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला

या कुत्र्याने कामगिरीच तशी केलेया. हा कुत्रा थेट वाघालाच भिडला आहे. हा कुत्रा नुसता भिडलाच नाही तर त्याने वाघाला पळवून लावले आहे(Thrill of leopard and dog attack). कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला आहे.  

Updated: Dec 1, 2022, 08:54 PM IST
कुत्ता नही... ये तो फायर है! Video पाहून असंच म्हणाल; कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला title=

हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : कुत्ता नही... ये तो फायर है! पुण्यातील(Pune) हा व्हायरल व्हिडिओ पाहून सगळे असंच म्हणत आहेत. या कुत्र्याने कामगिरीच तशी केलेया. हा कुत्रा थेट वाघालाच भिडला आहे. हा कुत्रा नुसता भिडलाच नाही तर त्याने वाघाला पळवून लावले आहे(Thrill of leopard and dog attack). कुत्र्याला घाबरुन वाघ पळून गेला आहे.  

शिकारीसाठी आलेला बिबट्या आणि कुत्र्याच्या झुंजीचा थरार सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक इथली ही घटना आहे.  रवीकिरण डोंगरे यांच्या घरासमोर अंगणात बसलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्यावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. वाघाने कुत्र्याची मान पकडली. यावेळी कुत्र्यानेही बिबट्यावर प्रतिहल्ला केला. मात्र, कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडला. कुत्र्याने देखील वाघावर जबरदस्त हल्ला केला. अखेर कुत्र्याला घाबरुन बिबट्याला पळ काढावा लागला. 

 

दरम्यान जुन्नर, आंबेगाव ,शिरुर आणि खेड तालुक्यात बिबट्यांचे लोकवस्तीलगत वाढते वास्तव्य दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या अंधारात बिबट्या शिकारीच्या शोधात लोकवस्तीत दाखल होत आहेत. नागरिकांचे रक्षण करणा-या कुत्र्याला हे वाघ भक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.