वाशीतून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण

वाशीमध्ये एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात केल्याची घटना पुढे आलेय. वाशी रेल्वे स्थानकात मुलाला एक व्यक्ती उचलून नेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेय.

Updated: Sep 9, 2017, 01:02 PM IST
वाशीतून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण title=

नवी मुंबई : वाशीमध्ये एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात केल्याची घटना पुढे आलेय. वाशी रेल्वे स्थानकात मुलाला एक व्यक्ती उचलून नेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेय.

 वाशी येथे झोपडपट्टीमध्ये राहणार मुलगा आपल्या आई सोबत वडापाव आणण्यासाठी गेला असता त्याला एका दारुड्या व्यक्तीने उचलून नेले. याप्रकरणी वाशी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. या अपहरणाचे सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले आहे.

वाशी रेल्वे स्टेशनवरुन संशयीत आरोपी रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून मुलाला कमरेवर घेऊन जात असताना दिसत आहे. तो पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमधून पसार झाला. 

अपहरण झालेल्या मुलाचे नाव रघु नाना शिंदे असून तो तीन वर्षांचा आहे. तो केरळ हाऊस समोरील झोपडपट्टी राहतो. त्याने हिरवा-पांढरा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.