दौंडमध्ये जुगाराच्या वादातून तीन जणांची गोळ्या घालून हत्या

दौंडमध्ये एसआरपीच्या जवानानं बारा हजार रुपयांच्या जुगाराच्या वादातून तीन जणांची गोळ्या घालून हत्या केलीय. संजय शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. 

Updated: Jan 16, 2018, 06:40 PM IST
दौंडमध्ये जुगाराच्या वादातून तीन जणांची गोळ्या घालून हत्या title=

पुणे : दौंडमध्ये एसआरपीच्या जवानानं बारा हजार रुपयांच्या जुगाराच्या वादातून तीन जणांची गोळ्या घालून हत्या केलीय. संजय शिंदे असं या आरोपीचं नाव आहे. 

एसआरपीच्या सात तुकड्या दाखल

गोळीबार केल्यानंतर संजय आपल्या घरात दडून बसलाय. घरात असलेले संजयचे दोन लहान मुलं बाहेर आली आहेत. मात्र त्याची पत्नी अजूनही घरातच आहे.  संजयला अटक करण्यासाठी एसआरपीच्या सात तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. त्याच्याकडे पिस्तूल असल्यामुळे पोलीस सतर्कता बाळगत आहेत. 

घरासमोर संतप्त लोकांचा मोठा जमाव

संजयच्या घरासमोर संतप्त लोकांचा मोठा जमाव असून परिसरात थोडा तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. गोळीबारात मारले गेलेले तिघे हे आरोपीसोबत जुगार खेळत असत. १२ हजार रूपयांच्या जुगाराच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. 

आरोपीच्या गोपाळवाडी येथील घरी मोठा फौजफाटा दाखल झाला असून एसआरपीच्या ७ तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. शेजारील इंदापूर , बारामती पोलिसस्टेशनमधूनही ज्यादा कुमक मागवण्यात आली आहे. त्यामुळे गावात मोठा तणाव आहे.