डीएसके प्रकरणातून 'या' अधिकाऱ्यांची सूटका होणार

न्यायालयात तीन नोव्हेंबरला या अहवालावर सुनावणी होऊन निर्णय होणार 

Updated: Oct 20, 2018, 10:26 PM IST
डीएसके प्रकरणातून 'या' अधिकाऱ्यांची सूटका होणार  title=

पुणे : महाराष्ट्र बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र मराठे, सुशिल मुहनोत आणि माजी कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता यांना क्लीन चीट देणारा अहवाल, पुणे पोलीसांनी शिवाजीनगर न्यायालयात दाखल केला. न्यायालयात तीन नोव्हेंबरला या अहवालावर सुनावणी होऊन निर्णय होणार आहे. 

न्यायालयाने हा अहवाल मान्य केल्यास, मराठे, मुहनोत आणि गुप्ता यांची डीएसके घोटाळ्यातून सुटका होणार आहे. हजारो ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या डीएसके घोटाळ्यात पोलिसांनी महाराष्ट्र बँकेच्या या तीन बड्या अधिकाऱ्यांना अटक केली होती. 

राजकीय दबाव  

आधी  या अधिकाऱ्यांना जामीन मिळण्यासाठी पोलिसांनी नकारात्मक भूमिका घेतली.

आता या अधिकाऱ्यांना या गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल पोलीसांनी दिला आहे.

पोलिसांच्या या यू टर्नमागे राजकीय दबाव असल्याचा आरोप करत, या अधिकाऱ्यांना क्लीन चीट द्यायला ठेवीदारांनी विरोध दर्शवला आहे.