आगीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! बुलडाणात एकाच दिवशी आगीच्या तीन घटना

बुलडाणा जिल्हा होरपळला आहे. आतापर्यंत जवळपास तीन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. 

Updated: Jun 1, 2022, 01:39 PM IST
 आगीच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला! बुलडाणात एकाच दिवशी आगीच्या तीन घटना title=

मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा - बुलडाणा जिल्हा होरपळला आहे. आतापर्यंत जवळपास तीन ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. 

खामगाव मतदारसंघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या शेताला मध्यरात्री अचानक आग लागली. हवा जोरात असल्यामुळे आमदारांच्या शेतातील आग इतर शेतकऱ्यांच्या शेतातही पसरली. आगीत संपूर्ण शेत जळून खाक झाले असून शेतीउपयोगी साहित्य, अवजारे सुद्धा जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. 

दुसऱ्या घटनेत पिकवलेला ऊस साखर कारखान्यांनी घेतलाच नाही म्हणून चक्क उभ्या पिकाला आग लावल्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यावर आली. दिनकरराव मोगल यांनी स्वतःच्या शेतातील ऊस पेटवल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये 25 गायींना कोंबून तस्करी करताना आढळले. नागरिकांना माहिती मिळताच संताप व्यक्त. नागरिकांचा संताप पाहून ट्रक चालकाने आणि त्याच्या साथीदाराने मिळून ट्रकच पेटवला. यामुळे शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक चालकासह साथीदारावर गुन्हा दाखल.