यवतमाळ : यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत.
तीव्र पाणीटंचाईमुळे या विहिरीचा उपसा सुरु असून विहिरीतील कचरा साफ करतांना परिसरातील युवकांना आधार कार्डचे गठ्ठे सापडले. सदर आधार कार्ड लोहारा परिसरातील आहे. यवतमाळ शहरात काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झालीय. त्यामुळे शहरातील विहिरींचं खोलीकरण आणि स्वच्छता मोहीम सुरू आहे.
साई मंदिर परिसरातील या विहिरीची स्वच्छता परिसरातील युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन सुरु केलीय. त्यावेळी प्लास्टिकची मोठी पिशवी दगडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. हे गठ्ठे वर आणून उघडली असता त्यात आधार कार्डचे गठ्ठे आढळले.