'...तोपर्यंत फेटा बांधणार नाही'; अमोल कोल्हेंचा निर्धार

अमोल कोल्हे यांनी फेटा बांधायला नकार दिला.

Updated: Aug 25, 2019, 08:26 PM IST
'...तोपर्यंत फेटा बांधणार नाही'; अमोल कोल्हेंचा निर्धार title=

बीड : बीड जिल्ह्यातल्या परळी आणि केज विधानसभा मतदारसंघात जो पर्यंत राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही. असा निर्धार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला आहे. शिवस्वराज्य यात्रा ही परळीहून अंबाजोगाईला आली होती. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. 

यावेळी नमिता मुंदडा यांनी अमोल कोल्हे यांना फेटा बांधायला घेतला. मात्र अमोल कोल्हे यांनी फेटा बांधायला नकार दिला. 

दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा आणि परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे आमदार होणार नाहीत, तोपर्यंत बीडमध्ये फेटा घालणार नाही, असा निर्धार कोल्हे यांनी केला आहे.