मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात काॅग्रेसचे माजी मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
मागील निवडणुकीत प्रचार संपला. मात्र, प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आपल्या मतदारसंघात आले होते, असा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार नसीम खान यांनी केला.
नसीम खान यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर या प्रकाराविरोधात दाद मागण्यासाठी नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
प्रचार संपल्यानंतर ही उद्धव ठाकरे माझ्या मतदार संघात आले. यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. ती पक्षाची भुमिका नाही असे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे.