महाराष्ट्रातील टोमॅटोचे गाव; इथल्या शेतकऱ्यांचा पॅटर्नच वेगळा

सातारा जिल्ह्यातील तळवडे गाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. इथल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोविक्रीसाठी राबवलेल्या पॅटर्नमुळे या गावाची जोरदार चर्चा आहे. 

वनिता कांबळे | Updated: Aug 2, 2024, 07:10 PM IST
महाराष्ट्रातील टोमॅटोचे गाव; इथल्या शेतकऱ्यांचा पॅटर्नच वेगळा title=

Maharashtra Satara Tomato Farmers : महाराष्ट्रातील  सातारा जिल्ह्यात तडवळे गाव सध्या टोमॅटोचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावाला टोमॅटोचे म्हणून ओळख मिळालेय ती इथल्या शेतकऱ्यांमुळे.   इथल्या शेतकऱ्यांचा पॅटर्नच वेगळा ठरला आहे. सध्या हे गाव चांगलेच चर्चेत आहे. जाणून घेऊया इथल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय केलय. 

‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच...

सातारा जिल्ह्यात तडवळे या गावात टोमॅटो उत्पादक शेतकरी ‘टोमॅटो आमचा, दरही आमचाच, असा संकल्प बांधत टोमॅटो विक्री करतायत. जिल्ह्यात सगळ्यात जास्त टोमॅटोचे उत्पन्न घेणारे गाव म्हणून या गावाने आपली ओळख निर्माण केलीये. या गावातील शेतकरी एकत्रितपणे मुंबई, पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांना माल देतायत. शेतक-यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या सातारा जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरूये.

गावातच दर ठरवतात आणि एकत्रत टोमॅटो विक्रीसाठी पाठवतात

गावातील तरुणांनी एकत्र येत चांगल्या दर्जाचे टोमॅटो उत्पादन घ्यायला सुरुवात केली त्यामुळे आधी गावात टोमॅटोचा दर ठरतो मग पुढे त्याच दराने माल दिला जातो.या गावातील शेतकरी एकत्रितपणे मुंबई, पुण्याच्या बाजार समितीतील घाऊक व्यापाऱ्यांना माल देतायत. शेतकऱ्यांची ही एकी आणि त्यांच्या या उपक्रमाची सध्या सातारा जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरू आहे.पिकांवर येणाऱ्या संकटाना हे गाव एकत्र तोंड देत आहे.  

शंभरी गाठलेल्या टोमॅटोचे दर खाली उतरले 

शंभरी गाठलेल्या टोमॅटो चे भाव या आठवड्यात खाली उतरले आहेत. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 60 ते 70  रुपये किलो झालेला टोमॅटो किरकोळ मद्ये 90 ते 100 रुपये पर्यत पोहचला होता. परंतु महाराष्ट्रात झालेला पाऊस  यामुळे टोमॅटो ची  गुणवत्ता घसरली असल्याने टोमॅटो ला भाव मिळत नाही.  पावसामुळे ग्राहक देखील कमी झाले असल्याने टोमॅटो  भाव घाऊक मार्केट मद्ये 20 ते 25 रुपये किलो विकला जात  असून किरकोळ मद्ये हाच टोमॅटो 50 ते 60 रुपया  वर आला आहे. सध्या  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती  महाराष्ट्रातुन आणि कर्नाटक मधीन टोमॅटो येत आहेत.  

टोमॅटो पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला

नाशिक जिल्ह्यात शेकडो एकरवरील मका आणि टोमॅटो पीकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. लष्करी अळी, करपा रोगाच्या विळख्यात पीकं सापडली आहेत. औषधांची फवारणी करूनही उपयोग होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.