Crime News: पुण्यात (Pune) आणखी एक चोरी (Theft) झाल्याची घटना समोर आली आहे. चतु:शृंगी (chaturshringi) पोलीस स्टेशनच्या हद्दीत जबरी घरफोडी झाली आहे. दरोडेखोरांनी अमेरिकन डॉलरसह लाखो रुपये लंपास केले आहेत. औंध परिसरातील स्नेहविहार सोसायटीत ही चोरीची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी सोनं चांदीचे भांडे, रोख रक्कम, पासपोर्ट असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे. चोरीच्या या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
यापूर्वीही चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंधू सोसायटीत जबरी चोरी झाली होती. चोरट्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवारांचे (Ajit Pawar) नातेवाईक असलेल्या व्यक्तीच्या घरातून रोख रक्कम आणि बंदूक चोरून नेली होती.
अजित पवार (Ajit Pawar) यांचे नातेवाईक जगदीश कदम यांच्या घरी नुकतीच चोरी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने थेट पंजाबमध्ये जाऊन आरोपीला अटक केली. मोहम्मद इरफान असं नाव असणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मोहम्मद इरफानविरोधात घरफोडी आणि चोरीचे तब्बल 27 गुन्हे दाखल नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रॉबिनहूड असं या आरोपीचं टोपण नाव आहे.
पोलिसांनी मोहम्मद इरफानला अटक केल्यानंतर त्याची छाडाछडती घेतली असता अनेक मौल्यवान गोष्टी सापडल्या आहेत. यामध्ये जॅग्वॉर कंपनीची आलिशान कारही आहे. याशिवाय महागडी घड्याळं, पिस्तूल आणि जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.
चोरीसाठी इरफान गुगलची मदत घेत होता. गुगलवर तो वेगवेगळ्या शहरात राहणाऱ्या श्रीमंत लोकांची माहिती घेत असे. यानंतर तो चोरीची संपूर्ण योजना आखण्यासाठी गुगलची मदत घेत असते. म्हणजे चोरी कशी करायची, ती केल्यानंतर तिथून पळ कसा काढायचा यासाठीचे मार्ग हे सर्व तो गुगलवर शोधत असे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.