श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे

श्रावणात घरी पूजा घालणार असाल तर, सावधान... कारण पुजेच्या बहाण्याने आलेले भामटे पुजारी पुजेऐवजी तुमचं घर लुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका आजीबाईंना असा अनुभव आलाय. 

Updated: Aug 1, 2017, 08:55 PM IST
श्रावण पूजेच्या निमित्तानं पुजाऱ्याच्या वेषात घरात शिरले भामटे title=

पुणे : श्रावणात घरी पूजा घालणार असाल तर, सावधान... कारण पुजेच्या बहाण्याने आलेले भामटे पुजारी पुजेऐवजी तुमचं घर लुटण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका आजीबाईंना असा अनुभव आलाय. 

बिबवेवाडीतल्या एका सोसायटीमध्ये दोन भामटे पुजाऱ्यांच्या वेशात शिरले. सोसायटीमधील काही लोकांकडून त्यांनी दान-दक्षिणादेखील गोळा केली. 

त्यानंतर सोसायटीतील एका घरात पुजेच्या बहाण्याने हे दोघे गेले. त्या घरात फक्त आजीबाई होत्या. त्यांची पर्स घेऊन घेऊन हे दोन भामटे पसार झाले. आजीबाईंनी आरडाओरडा केल्यानं या दोघांनी काढता पाय घेतला. त्यामुळं आणखी काही दुर्घटना टळली. 

पुजाऱ्यांच्या वेशात आलेले हे दोघे सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.  

श्रावण महिन्यात पूजा किंवा ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने कोणी आल्यास नागरिकांनी सावध रहावे, असं आवाहन पोलिसांनी केलंय.