नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी... तरुणांनो वाचा आणि लागा तयारीला

कोरोनाचा कठीण काळ, वाढती बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण व महागाई यांचा ताळमेळ साधत असताना बेरोजगारांना नोकरीच्या संधीची आतुरतेने प्रतीक्षा आहे. 

Updated: Nov 11, 2022, 01:36 PM IST
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी... तरुणांनो वाचा आणि लागा तयारीला title=
Looking for a job

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: राज्यात पोलीस भरतीची (Police Recruitment news today0 जाहिरात जारी होताच इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा संकुलात भरती इच्छुक उमेदवारांची (Police Recruitment Advertisement in Marathi) सकाळपासून गर्दी पाहायला मिळते आहे. मोठ्या कालखंडानंतर सरकारी नोकरीची संधी असल्याने तरुणांच्या आशा पल्लवीत झाल्याचे पाहायला मिळते आहे. (the preparation of the aspirants for police recruitment is speeding up in chandrapur district)

कोरोनाचा कठीण काळ, वाढती बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे कमी झालेले प्रमाण व महागाई यांचा ताळमेळ साधत असताना बेरोजगारांना नोकरीच्या संधीची आतुरतेने प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने नुकतीच पोलीस भरती जाहीर केली. कोरोनाचा काळ वयोमर्यादा निकषात अडसर वाटू लागतानाच राज्यातील बेरोजगार व इच्छुक तरुणांना आशेचा किरण दिसू लागलाय. चंद्रपूरसह राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अनुकूल वातावरण बघता आपल्या तयारीला वेग दिला आहे. चंद्रपूर (Chadrapur) जिल्हा क्रीडा संकुलात पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी सकाळपासून सरावासाठी गर्दी चालवली आहे. यात युवतीवर्गाची लक्षणीय उपस्थिती आहे. पुढील काही दिवसात शारीरिक व बौद्धिक सरावासाठी तरुण सज्ज झाले आहेत. 

मात्र ही भरती जाहीर करताना राज्य सरकारने काही घटकांवर अन्याय केला असून ओबीसीबहुल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जागा मात्र तुलनेने कमी आहेत. या जागा निश्चित करताना मुंबईला प्राधान्य दिल्याचे शल्य बेरोजगार तरुणांमध्ये (Youngters) असून कारागृह प्रशासनाच्या जाहिराती देखील तातडीने काढून गेल्या काही काळात भरती ठप्प झाली असताना अनुशेष भरून काढण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. 

पोलीस भरतीसाठी लागणारे सर्व घटक सरावादरम्यान नियमितपणे होतील याकडे तरुण लक्ष देत असून चंद्रपूरसह तालुका क्रीडा संकुले व मोकळ्या मैदानांवर पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी यंदा "संधीचे सोने करायचेच" या निर्धाराने वाटचाल सुरू केली आहे.