मुंबईला टक्कर देतात ठाण्यातील पॉश वस्त्या; शांत, निवांत परिसरात अलिशान घरं

ठाण्यातील हाय प्रोफाईल एरिया कोणते? इथं घरांच्या किमती किती आहेत जाणून घेऊया.

वनिता कांबळे | Updated: Oct 11, 2024, 08:29 PM IST
मुंबईला टक्कर देतात ठाण्यातील पॉश वस्त्या; शांत, निवांत परिसरात अलिशान घरं title=

Thane High Profile Area : मुंबईची जुळी बहिण अशी ठाणे शहराची ओळख आहे. ठाणे ठहर हे झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. यामुळे मुंबई प्रमाणचे ठाण्याची देखील डिमांड वाढत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले ठाणे शहर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे. शांत, निवांत परिसरात अलिशान घर असावं अस आता प्रत्येकालाच वाटत आहे. जाणून घेऊया मुंबईला टक्कर देणाऱ्या ठाण्यातील पॉश वस्त्या कोणत्या.

हे देखील वाचा... मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपती

घोडबंदर रोड

घोडबंद रोड हा ठाण्यातील हाय प्रोईफाईल एरिया आहे. अनेक बड्या टाऊनशीप येथे आहेत. 

उपवन

उपवन हा ठाण्यातील सर्वात शांत परिसर आहे. उपवन लेक भोवती उभारण्यात आलेल्या घरांच्या किंमत खूपच महाग आहेत. 

माजिवडा

माजिवडा हे ठाण्यातील अपमार्केट एरिया आहे. येथे देखील घरांच्या किमंती खूप महाग आहेत. 

कोलशेत

कोलशेत हे ठाणे पूर्व आणि ठाणे पश्चिम दरम्यानचे मध्यवर्ती ठिकाणी आहे. हा देखील ठाण्यातील हायप्रोफाईल एरिया आहे. 

वर्तक नगर

वागळे इस्टेट, जेके ग्राम आणि कापूरबावडी दरम्यान वर्तक नगर आहे. वर्तक नगर हे छाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मुंबई, भिवंडी आणि मीरा-भाईंदर सारख्या पश्चिम उपनगरांना आणि त्यापलीकडे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि घोडबंदर रोडद्वारे कनेक्टिव्हिटी मिळते. या एक ठाण्यातील मोठा हाय प्रोफाईल एरिया आहे. 

नौपाडा

नौपाडा हा देखील ठाण्यातील सर्वात महागडा परिसर आहे. ठाणे स्टेशनपासून जवळ असल्यामुळे येथे घरांच्या किंमती खूपच महाग आहेत.

येऊर

येऊर हा देखील ठाण्याातील हाय प्रोफाईल एरिया आहे. येऊर हे हिलस्टेशन आहे.  येथे अनेक मोठे बंगले आणि व्हिला आहेत. 

ब्रम्हांड

ब्रम्हांडे हा देखील ठाण्यातील हाय प्रोफाईल एरिया आहे. स्टेशन पासून थोडसं दूर असलेल्या ब्रम्हांड परिसरात घरांच्या किंमती खूर महाग आहेत.