मुंबई : Sanjay Raut : आयएनएस विक्रांत युद्धनौका (INS Vikrant Warship Fund) वाचविण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा करून तो हडप केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. त्यानंतर सोमय्यांनी पुरावे मागितल्यावर राऊत चांगलेच संतापलेत. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव दिल्लीत शिजतोय आणि त्या कटाचे सूत्रधार सोमय्या आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी भाजप नेते किरीट सोमय्यांनी निधी गोळा करून तो हडप केल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. भारतीय नौदलातून निवृत्त झालेली आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी लोकांकडून पैसे जमा केले. साधारणपणे 57 ते 57 कोटी रूपये सोमय्यांनी जमा केले. ते पैसे राजभवनाकडे देणार असल्याचं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. पण ही रक्कम राजभवनाकडे आलीच नाही असं आरटीआयमधून उघड झालंय.
किरीट सोमय्या ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. ही कीड मी संपवणार, असा थेट हल्लाबोल संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर चढवला. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS Vikrant वाचविण्याच्या नावाखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपये हडप केले आहेत, असा आरोप केला. यासाठी संजय राऊत यांनी राजभवनाच्या पत्राचा दाखला दिला. राजभवनाकडून आलेले पत्र पुरावा नाही का, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली सोमय्यांनी कोट्यवधी रक्कम जमा केले
जमा झालेला निधी राजभवनात जमा केला नाही
सोमय्यांनी निधी मुलाच्या कंपनीसाठी वापरला
सीए असल्याने पैसा कसा जिरवायचा ते सोमय्यांना माहिती
अनेक माजी सैनिकांनी यासाठी निधी दिला. सीबीआय, ईडी, आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी राऊत यांनी केली.