सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं गुढ उकलणार? आली मोठी माहिती समोर

आता अपघातग्रस्त कारच्या तपासणीबाबत मोठी अपडेट समोर!

Updated: Sep 13, 2022, 07:24 PM IST
सायरस मिस्त्रींच्या मृत्यूचं गुढ उकलणार? आली मोठी माहिती समोर title=

Cyrus Mistry Car Accident : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातमध्ये मृत्यू झाला होता. मर्सिडीज बेंझ जीएलसी 220 डी 4 मॅटिक कारने ते मुंबईकडे जात असताना त्यांचा अपघात झाला होता. जास्त वेग असल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. अपघाताआधी कारचं स्पीड किती होतं? ब्रेक कधी लावले? याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता. आता अपघातग्रस्त कारची तपासणी करण्यासाठी एक पथक आलं आहे 

कारच्या तपासणीसाठी मर्सिडीज बेंझ कंपनीचं पथक हाँगकाँगहून मुंबईत आलं आहे. हे पथक सोमवारी भारतात पोहोचलं असून मंगळवारपासून कारची तपासणी सुरू झाली आहे. सध्या ही अपघातग्रस्त कार ठाण्यातील मर्सिडीज बेंझच्या शोरूममध्ये आणण्यात आली आहे.  

हाँगकाँगहून मर्सिडीज बेंझ कार कंपनीचं पथक मुंबईत पोहोचल्याचं पालघरचे एसपी बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. तीन सदस्य असून ते टेक्निकल एक्सपर्ट आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे पथक मंगळवारपासून कारची तपासणी सुरू करणार आहे. ही टीम मर्सिडीज बेंझ कंपनीला अहवाल सादर करणार आहे. कार कंपनी अपघाताशी संबंधित अंतिम अहवाल पोलिसांनाही देणार आहे.

 मुंबईकडे जात असताना मिस्त्री यांची कार दुभाजकावर आदळली होती. कारमध्ये एकूण चार जण होते आणि त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले होते. आता हाँगकाँगच्या पथकाच्या तपासातून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.