संपूर्ण घराची राखरांगोळी, शॉर्ट सर्किट आगीने कुटुंब रस्त्यावर

House fire : एक धक्कादायक घटना. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे.  

Updated: Mar 28, 2022, 07:24 AM IST
संपूर्ण घराची राखरांगोळी, शॉर्ट सर्किट आगीने कुटुंब रस्त्यावर title=

गोंदिया : House fire at Gondia : एक धक्कादायक घटना. आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. गोंदिया शहरातील शास्त्री वार्ड येथील  ही घटना आहे. शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली आणि बघता बघता लागलेल्या आगीत घर जळून गेले.

शॉर्ट शर्किटने आग लागल्याचे समजात वेळीच घरातील लोक घराबाहेर धावत बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. मात्र, घरातील साहित्य आणि अन्नधान्य, पैसे आणि दागिण्यांची राख रांगोळी झाली आहे. आग इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण घर जळून खाक झाले.

अग्निशामक दलाला वेळीच पाचारण करण्यात आल्याने आगीवर नियत्रंण मिळविण्यात यश आले. आगीचा भडका अधिक उडाला असता तर आजू-बाजुच्या इतर घराच्या घरांना मोठा धोका पोहोचला असता. मात्र, आगीपासून अन्य घरांना वाचविण्यात यस आले. दरम्यान, तात्काळ घराचा पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.