माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलली

वर्षभरात होणाऱ्या चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलून गेलीय. माघी वारीसाठी जवळपास दोन  लाखांहून अधिक भाविक पंढरी नगरीत दाखल झालेत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 28, 2018, 05:55 PM IST
माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलली title=

पंढरपूर : वर्षभरात होणाऱ्या चार यात्रांपैकी एक असलेल्या माघी वारीनिमित्त पंढरी भक्तांनी फुलून गेलीय. माघी वारीसाठी जवळपास दोन  लाखांहून अधिक भाविक पंढरी नगरीत दाखल झालेत. 

माघी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या पादुंकांचं दर्शन घेण्यासाठीची रांग ही गोपाळपूरपर्यंत गेलीय तर दर्शनासाठी आठ ते नऊ तासांचा कालावधी लागतोय. 

दरम्यान, चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर तसच प्रदक्षिणा रोड भाविकांनी गजबजून गेलाय. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यामध्ये २ पोलीस उपअधीक्षक, ९ पोलिस निरीक्षक, ४ महिला पोलिस, ४००  पोलिस, ३०० होमगार्ड आणि राज्य राखीव दल तैनात करण्यात आलेत.