कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. 

Updated: Apr 30, 2021, 03:42 PM IST
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज जनतेला संबोधित करणार title=

मुंबई :  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यातील लसीकरण मोहीम आणि कोरोना प्रतिबंधासाठी राज्याची तयारी याबाबत मुख्यमंत्री बोलणार असल्याची शक्यता आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी 1 मे पासून 18 वर्षा वरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. त्याबाबतीत नियोजन आणि धोरण याविषयी मुख्यमंत्री आपल्या संबोधनात बोलतील. 

राज्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध वाढवण्यात आले आहेत. तसेच ऑक्सिजनची- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धता आणि राज्याच्या एकंदरीत तयारीबाबत मुख्यमंत्री जनतेला संबोधित करतील.