ठाणे शिवसेना संघटक शैलेश निमसे यांचा मृतदेह सापडला

ठाण्यातले शिवसेनेचे संघटक शैलेश निमसे यांचा मृतदेह सापडला आहे.

Updated: Apr 20, 2018, 05:40 PM IST

ठाणे : ठाण्यातले शिवसेनेचे संघटक शैलेश निमसे यांचा मृतदेह सापडला आहे. देवचोले गावानजिक अर्धवट जळलेल्या अवस्थेतला शैलेश निमसे यांचा हा मृतदेह आहे. शहापूर तालुक्यातल्या आगाई गावात शैलेश निमसे राहत होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही हत्या कोणी केली याचा शोध पोलीस घेत आहेत.