बदलत्या यूवा पिढीचं मूळ शालेय जीवनात: विजय कुवळेकर

मनं अशांत आहेत, मनं अस्वस्थ आहेत. त्यामुळे मानवी मन शांत होणं गरजेचं आहे

Updated: Apr 21, 2018, 08:09 PM IST
बदलत्या यूवा पिढीचं मूळ शालेय जीवनात: विजय कुवळेकर title=

ठाणे : आजच्या काळाचा विचार करता युवा पिढी बदलताना दिसतेय. आणि याचं मूळ शालेय जीवनातच रुजतं. सुसंवाद, सुसंस्कार अशी काहीही नावे दिली तरी, मन मनाला जोडणं हा मूळ गाभा आहे विचारांचा. मनं अशांत आहेत, मनं अस्वस्थ आहेत. त्यामुळे मानवी मन शांत होणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन झी २४ तासचे संपादक विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.

ठाण्यातील डॉ संदीप माने यांनी यासाठीच काम करणाऱ्या ओरिजिन फाऊंडेशन संस्थेचे निर्मण करायचे ठरवले होतं. त्याचं उदघाटन ठाण्यात झालं. या कार्यक्रमावेळी 'झी 24 तास'चे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी हे विचार मांडले. दरम्यान, या कार्यक्रमास शास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर ,प्राचार्य अशोक चिटणीस आणि प्रसिद्ध गजल गायक भीमराव पांचाळ हे मान्यवरही उपस्थित होते.