Thane Mahanagar Palika Bharti 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ठाणे पालिकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ठाणे महानगरपालिके अंतर्गत एकूण 63 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी तुम्हाला कोणती लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीत निवड झाल्यास तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे.
ठाणे महानगरपालिकेतील 63 रिक्त जागांमध्ये शस्त्रक्रिया सहाय्यक, न्हावी, ड्रेसर, वर्ड बॉय, दवाखाना आया, पोस्टमार्टम अटेंडंट, मॉच्युरी अटेंडन्ट या पदांचा समावेश आहे. तुमच्याकडे वरील कामाचा अनुभव असेल तर वेळ न घालवता तात्काळा मुलाखतीचा पत्ता लिहून ठेवा. तारीख, वेळ माहिती करुन घ्या. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असेल, याची नोंद घ्या.
रिक्त पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ठाण्यात नोकरी करावी लागणार आहे. 70 वर्षाच्या आतील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
ठाणे महानगरपालिका भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत 26, 30 सप्टेंबर आणि 03, 04 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. दिलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर पुन्हा मुलाखत होणार नाही. तसेच उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.
रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपल्या अर्जासह 'कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे” या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.