Thane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात

Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं

Updated: Jan 12, 2023, 03:03 PM IST
Thane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात title=

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे जिल्ह्यात (Thane Crime) एक विचित्र घटना समोर आली आहे. ठाण्यातल्या कापूरबावडी इथल्या एका ज्वेलरीच्या दुकानात (Jewellery Shop) चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांनी दुकानातील कर्मचाऱ्याला दमदाटी केल्याचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती.संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी तपास सोडलान नाही. नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेतल्यानंतर नक्कीच डोकं चक्रावून जाईल.

काय आहे नेमकं प्रकरण?
आपल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो (Girl Obscenes Photos) व्हायरल करण्याची धमकी देत तिला घरातील दागिने चोरण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका व्यक्तीने अल्पवयीन मुलाविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawdi Police Station) तक्रार दाखल केली होती. यानंतर कापूरबावडी पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी मुलीच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. पोलिसांच्या चौकशीत या मुलाने प्रगती ज्लेलर्स नावाच्या दुकानात दागिने विकल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी प्रगती ज्वेलर्समध्ये चौकशी केली असता तो मुलगा तिकडे आलाच नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढलं.

प्रकरण वेगळंच होतं
पोलिसांना याप्रकरणात वेगळाच संशय होता. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मुलीला विश्वास घेत तपास सुरु केला. तिच्या चौकशीत वेगळंच प्रकरण समोर आलं. अल्पवयीन मुलीनेच हा सर्व बनवा रचल्याचं पोलिसांच्या तपास समोर आलं. त्या मुलीचा आलोक राऊत नावाचा मित्र आहे. त्याला वाचवण्यासाठी मुलीने हा सर्व खटाटोप केला. 

अलोक राऊत या मित्राचा वाढदिवस (Birth Day) होता, त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याम मुलीने स्वत:चं आपल्या घरातले दागिने चोरले त्यानंतर मित्र अलोकच्या मदतीने त्यांनी भिवंडीतल्या एका ज्वेलर्सच्या दुकानात ते विकले. दागिने विकून आलेल्या पैशातन त्या दोघांनी जोरदार पार्टी केली. इथं दागिने चोरीला गेल्याचं मुलीच्या आई-वडिलांना कळल्यावर त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याने मुलगी घाबरली. तीने आपल्या स्वत:ला आणि अलोकला वाचवण्यासाठी पहिल्या मित्राला बळीचा बकरा बनवायचं ठरवलं. 

पोलिसांच्य तपासात तीने त्या मित्राने आपल्याला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दागिने चोरायला लावले असं सांगितलं. पण अखेर सत्य समोर आलं,  कापूरबावडी पोलिसांनी केलेल्या अत्यंत संयमित आणि सखोल तपासाने तो अल्पवयीन मुलगा निर्दोष होता हे सिद्ध झाले. दरम्यान या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची बाल न्यायालयात रवानगी केली असून मुख्य आरोपी तिचा मित्र अलोक राऊत आणि ज्वेलर्स मालक बासुकी सुरेंद्र वर्मा या दोघांनाही अटक करण्यात आलीय...