व्हिडिओ : 'सैराट' नेत्यांचा 'झिंगाट' डान्स

निमित्त होतं ठाण्यातल्या खारेगाव परिसरात आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने गावदेवी कार्निवल २०१८ या कार्यक्रमाचं...

Updated: Apr 30, 2018, 11:37 PM IST

ठाणे : आता बातमी एका झिंगाट डान्सची... हा झिंगाट डान्स रंगला होता ठाण्यात... निमित्त होतं ठाण्यातल्या खारेगाव परिसरात आदर्श सामाजिक संस्थेच्या वतीने गावदेवी कार्निवल २०१८ या कार्यक्रमाचं... या कार्यक्रमात अजय अतुलनं झिंगाट गाणं सादर केलं आणि त्यावर ठाण्यातल्या सगळ्या बड्या राजकीय नेत्यांनी सैराट होत डान्स केला. माजी खासदार आनंद परांजपे, सभागृह नेते नरेश म्हस्के, निरंजन डावखरे, पूर्वेश सरनाईक यांच्यासह नगरसेवकांनी सैराट डान्स केला. ठाणेकरांची यानिमित्तानं चांगलीच करमणूक झाली.