सागर आव्हाड / पुणे : TET Exam Scam : टीईटी नकली प्रमाणपत्रातून पाच जणांनी 234 कोटींहून अधिक पैसे कमावल्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पडताळणी न करता शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र स्वीकारल्याचे उघड झाले आहे. ज्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अशी पडताळणी न करता ही सर्टीफिकेट घेतली ते शिक्षणाधिकारी आता रडारवर आहेत. ( Rs 234 crore collected from TET scam)
7900 उमेदवारांकडून 2 ते 3 लाख रूपये वसूल केल्याची माहिती उघड होत आहे. याप्रकरणी परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकरला अटक झाली. फरार एजंटचा शोध सुरु आहे.
दरम्यान, टीईटी पेपरफुटीप्रकरणी (TET Exam) जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक अश्विनकुमार शिवकुमार याने तुकाराम सुपे याला तब्बल 30 लाख रूपये दिले. शिवकुमारनेच ही माहिती पोलिसांना दिली आहे. त्या (Shivkumar pays Rs 30 lakh to Tukaram Supe)
2018 मध्येच हे प्रकरण उघडकीला आले असते. पण सुपे याने हे प्रकरण दडवले, अशी माहिती शिवकुमारच्या चौकशीत बाहेर आली आहे. टीईटी पेपरफुटीप्रकरणी सुपे आणि परीक्षा घेणाऱ्या जीए कंपनीचा संचालक डॉ. प्रितीश देशमुखचा एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना अटक करण्यात आली आहे.