मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोने घेतला अचानक पेट

टेम्पोला अचानक सागली आग

Updated: Jun 21, 2018, 08:28 PM IST

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर लोणावळा शहर हद्दीमध्ये एका परचुटन समान घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली. त्यामुळे एक्सप्रेस हायवेने मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुनेगाव पुलाजवळ ऍसिडचे कॅन, कागद आणि इतर काही परचुटन समान पुण्याच्या दिशेने घेऊन जात असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. सदर घटनेची माहिती मिळताच आय.आर.बी. च्या अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी पोचली. त्या्नंतर आग विझविण्यात आल्यावर ठप्प झालेली वाहतूक पुनः पूर्ववत करण्यात आली.