सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिक

महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं. 

Updated: Apr 15, 2018, 05:56 PM IST
सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत, पुढील लक्ष्य ऑलिम्पिक title=

पुणे : महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं. याशिवाय ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात तिनं रौप्यपदक पटकावण्याची किमया साधली होती. तिच्या या कामगिरीनंतर पुण्यात तिचं मोठ्यात जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

महाराष्ट्राच्या सुवर्णकन्येचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुणेरी पगडी घालून तेजस्विनीची यावेळी मिरवणूक काढण्यात आली. 

आपल्या यशाचं श्रेय तेजस्विनीने कुटुंबीय, गुरु आणि देशवासियांना दिलं. दोन्ही पदकं भारतीय जवानांना समर्पित केल्याचंही त्यानं म्हटलंय.

तेजस्विनी सावंतनं लष्कराच्या कृत्रिम अवयव केंद्रात जाऊन अपंग जवानांची भेटही घेतली. तेजस्विनीशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी.... 

सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत