शिक्षक दिन : कोरोना काळातही निराधार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे

कोरोना काळातही शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे 

Updated: Sep 5, 2020, 01:41 PM IST

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : कोरोना मूळे असलेल्या लॉकडॉउन मुळे सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला यातून शिक्षण क्षेत्र ही सुटले नाही या शिक्षण क्षेत्राला ही या भयंकर फटका बसला आहे. हळूहळू अनलॉक झालं असले तरी अद्यापही शाळा सुरू करायच्या की नाही याचा निर्णय मात्र अजूनही व्हायचा आहे. मात्र लॉकडाऊन मूळे देशातील व राज्यातील सर्व शाळा अद्यापही बंद असल्या तरी अमरावती मधील एक शाळा मात्र कोरोना काळातही सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देत आहे. आदिवासी आश्रम शाळेचे  संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले हे कार्य करतायत.

कोरोनाची कुठलीही भीती मनाशी न बाळगता आनंदाने पाढे म्हणणारे, गीत गाणारे विद्यार्थी इथे आहेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेशवर तालुक्यातील मंगरुळ चव्हाळा या गावातील प्रश्नचिन्ह आश्रम शाळेत आनंदाचं चित्र पाहायला मिळतं. मतीन भोसले फासे पारधी समाजातील 37 वर्षीय वर्षाचा शिक्षक ज्यांनी सरकारी नोकरीला लाथ मारून फासेपारधी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय.

दिवसेंदिवस कोरोना रुग्ण राज्यात वाढत असतानाच शाळा सुरू करायचं की नाही असा प्रश्नचिन्ह सरकारसमोर असतांना मात्र मतीन भोसले यांनी हा प्रश्नच पाच महिन्यांपूर्वी निकाली काढला आहे. एकीकडे लॉकडॉऊनमुळे देशभरातील राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा मोठं शैक्षणिक नुकसान झालं परंतु अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेली प्रश्नचिन्ह आश्रमशाळा ही मात्र कोरोना काळातही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.

प्रश्नचिन्ह आश्रम शाळा ही लोकवर्गणी आणि भिकेच्या पैशातून उभी राहिलेली ही शाळा भीक मागणाऱ्या पारधी समाजातील ४७१  विद्यार्थ्यांना शिक्षण रुपी पोट भरणारी ठरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना च्या काळातही मतीन भोसले यांनी कठीण परिस्थितीला तोंड देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम हे कायम ठेवलं त्यामुळे लॉक डॉउन मध्येही विद्यार्थ्यांची शिक्षण गुणवत्ता वाढत होती.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घ्यावयाची काळजी पासून सर्व जबाबदारी मतीन भोसले यांनी पार पाडली विद्यार्थ्यांना दररोज सकाळी योगा प्राणायामपासून ते विविध प्रकारचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले.