महाराष्ट्राच्या मदतीला धावले टाटा, अंबानी ; राज्याला 'इतके' टन ऑक्सिजन पुरवणार

राज्याला संकट काळात सहकार्य

Updated: Apr 19, 2021, 08:23 AM IST
महाराष्ट्राच्या मदतीला धावले टाटा, अंबानी ; राज्याला 'इतके' टन ऑक्सिजन पुरवणार title=

नवी दिल्ली : टाटा ग्रुप राज्यासह देशाच्या संकट काळात धावून येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. महाराष्ट्रात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी टाटा स्टील महाराष्ट्राच्या मदतीला धावून आलीय. दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील राज्याला संकट काळात सहकार्य केलंय. 

सुमारे शंभर टन ऑक्सिजन टाटा स्टीलकडून राज्याला पुरवला जाणार आहे. टाटा स्टीलने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिलीय. देशात रोज अनेक राज्यांना200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्ही देखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू' असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केलाय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत या माहितीला दुजोरा दिलाय.

अंबानीही आले धावून 

जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडूनदेखील महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा होणारेय. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याची माहिती समोर येतेय.