किरकोळ वादातून तलवार, पाईपने मारहाण

सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद 

Updated: Mar 17, 2020, 08:04 AM IST
किरकोळ वादातून तलवार, पाईपने मारहाण title=

बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव शहरातल्या एकता नगरमध्ये किरकोळ वादातून चक्क तलवारीने मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 7 ते 8 जण चक्क तलवार,लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत असून हा संपूर्ण प्रकार cctv मध्ये चित्रीत झाला आहे. घरासमोर राहणाऱ्या व्यक्ती सोबत रस्ता वापरण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. या मारहाणीत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या संदर्भात खामगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. आत्तापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

एका किरकोळ वादावरून तलवार बाहेर काढली जाते ही अतिशय धक्कादायक घटना आहे. हा वाद एका रस्त्यावरून झाला. या घटनेवरून हे लक्षात येते की, स्थानिक नागरिकांवरील पोलिसांचा दबाव कमी झाला आहे. एका रस्त्यावरून हा वाद गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षातील काही लोकं भेटणार होते. या भेटीत चर्चेच्यावेळी वाद आणखी चिघळला आणि वादात रूपांतर झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्याशी संबंधीत दोन जणांना अटक करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली. तसेच वाद ज्या रस्त्यावरून सुरू झाला त्यावर देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल.