शेवगाव : ऊस दरांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव आणि औरंगाबादच्या पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारालेलं आंदोलन चिघळलंय.
शेवगावात आज सकाळपासून अनेक गावांमध्ये टायर जाळून रस्तारोको करण्यात आलाय. पोलीसांनी आधी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुराचा वापर केलाय. त्यानंतर हवेत तीन राऊंड गोळीबारही करण्यात आला. सौम्य लाठीमारात काही शेतकरी जखमी झाले आहेत. काही ठिकाणी टायरही जाळण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमध्ये आणि पैठणमध्ये उसाला 3100 रूपयांचा दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आलंय. सकाळपासून आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. तसंच अडवलेल्या वाहनांच्या चाकांची हवाही सोडली. मात्र पोलिसांनी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्ष प्रकाश बालवडकर आणि अमर कदम यांना बळाचा वापर करून पहाटेच अटक केली. त्यामुळं संतप्त शेतक-यांनी जाळपोळ आणि रास्तारोको सुरू केला.शेवगाव मध्ये दोन बस पेटवल्या आहेत.