एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम

उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची.  

Updated: Oct 20, 2020, 06:26 PM IST
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम  title=
संग्रहित छाया

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीची आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची. मात्र, असे असले तरी भाजपचे नेते आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे हे भाजपमध्येच राहतील ते कोठेही जाणार नाहीत, असा वारंवार दावा करत आहेत. मात्र, खडसे राष्ट्रवादीच प्रवेश करणार, अशीच चर्चा जोरदार आहे. असे असले तरी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडूनही खडसे यांच्या प्रवेशाबाबत काहीही संकेत दिले जात नाहीत. राष्ट्रवादीकडूनही गुप्तता पाळण्यात येत आहे. खडसेंबाबत दोन दिवसांत बोलणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचन विधान केले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. तर नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते कुठंही जाणार नाहीत, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हटले आहे. जळगावच्या राजकारण हे जळणारे पण आहे आणि त्यावर पाणी टाकणारेही आहे, असेही ते म्हणालेत.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या जाहीर टीकेनंतर आणि खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर  देवेंद्र फडणवीस काही दिवांसपूर्वी जळगाव जिल्हयात आले होते ,या कार्यक्रमाला खडसे उपस्थित राहणार का असा प्रश्न केला जात होता. मात्र, या कार्यक्रमपासून खडसे यांनी लांबच राहणे पसंत केले. त्यामुळे खडसे यांची नाराजी कायम असल्याचे दिसून आले होते.