सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला एक भन्नाट किस्सा

पत्रकार संजय पाठक यांनी लिहलेल्या ‘फेटे आणि फटकारे’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक धमाल किस्सा सांगितला. 

Updated: Dec 15, 2017, 07:15 PM IST
सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितला एक भन्नाट किस्सा title=

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : पत्रकार संजय पाठक यांनी लिहलेल्या ‘फेटे आणि फटकारे’ या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी एक धमाल किस्सा सांगितला. 

पाठक यांनी आपल्या पुस्तकात सोलापूर जिल्ह्यातल्या एका राजकीय नेत्यावर उपहासात्मक लिखाण केलंय. त्याचा धागा पकडत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात एका मंत्र्याचा धमाल किस्सा सांगितला.

काय म्हणाले शिंदे?

एक मंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते.....मंत्र्यांच्या PA नं तसे जिल्हाधिका-यांना आदल्या दिवशी कळवले...मंत्री महोदय उद्या रात्री जिल्हा मुक्कामी येत आहेत...त्यानिमित्त त्यांच्यासाठी जेवणाचा चांगला मेन्यू, रात्री झोपताना दूध आणि फळं अशी व्यवस्था करा....सुचनेच्या पत्रात मंत्रयांच्या PA नं सर्वात शेवटी वैगरे वैगरे असा शब्दप्रयोग करीत वाक्य संपवलं..ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री मंत्रयांची स्वारी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाली...लोकांच्या भेटीगाठी संपल्यानंतर स्वारी बेडरूममध्ये आरामासाठी गेली...आत शिरताच मंत्री पाहातात काय तर चक्क एक बाई डोक्यावर पदर घेऊन आधीच बेडवर बसलेली !!!! तिला पाहून मंत्र्यांना धक्काच बसला...त्यांनी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून या प्रकाराबाबत विचारणा केली... जिल्हाधिका-यांनीही PA च्या सूचनेतल्या ‘वैगरे वैगरे’ चा दाखला देत झालेल्या प्रकारातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला...

सभागृहात एकच हशा

सुशीलकुमार शिंदे यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात प्रचंड हशां पिकला..‘वैगरे वैगरे’ घडलेल्या या प्रसंगातला मंत्री, त्यांचा PA आणि जिल्हाधिकारी यांचं नाव मात्र शिंदे यांनी गुलदस्त्यात ठेवले.