पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन

काळीपट्टी बांधून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध

Updated: Oct 2, 2018, 10:15 AM IST
पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन title=

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पुतळ्यासमोर चेहऱ्याला काळीपट्टी बांधून सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध केला.

सरकारच्या विरोधात आंदोलन

पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडर दरवाढ, जीवनावश्य वस्तूंची दरवाढ, राफेल घोटाळा, विचारवंतांच्या हत्यांबाबतचा तपास, छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची उंची, शेतकरी आत्महत्या, शिक्षक भरती आणि अन्य प्रश्नांबाबत सरकारच्या विरोधात या आंदोलनात निषेध व्यक्त करण्यात आला.

मुंबईत अजित पवारांचं आंदोलन

मुंबईत पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मंत्रालयजवळ असलेल्या गांधी पुतळ्याच्या बाजूला अजित पवारसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही हा मोर्चात सहभागी झाले आहेत.