'बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही'; सुप्रिया सुळेंचा शरद पवारांशी भावनिक 'संवाद'

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते पक्ष सोडत आहेत. 

Updated: Aug 29, 2019, 09:05 PM IST
'बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही'; सुप्रिया सुळेंचा शरद पवारांशी भावनिक 'संवाद' title=

ठाणे : विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते पक्ष सोडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांचे वडिल शरद पवार यांना उद्देशून भावनिक वक्तव्य केलं आहे. 'कालच माझं शरद पवारांशी बोलणं झालं. बाबा नशीब तुम्हाला मुलगा नाही, असं मी त्यांना म्हणाले. तेव्हा असं का बोलतेस? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आताचे ७५ वर्षांचे वडिल मुलासाठी नको त्या माणसाकडे झुकतात,' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी पक्षातून जाणाऱ्या नेत्यांबद्दल दिली.

सुप्रिया सुळे या त्यांच्या संवाद यात्रेसाठी ठाण्यात आल्या होत्या. ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणं आवश्यक आहे. सरकारने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचं काय झालं? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. टोलविरोधात ठाण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन करावं, मी स्वत: या आंदोलनासाठी येईन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्रात रोजगार असतील असं मुख्यमंत्री म्हणत असतील, तर माझ्या पुणे जिल्ह्यात १० हजार बेरोजगार आहेत, त्यांना नोकऱ्या द्या, असं आव्हान सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.