... जेव्हा सुप्रिया सुळे सायकल चालवतात

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क सायकल चालवतात

मुंबई : एकीकडं इंधन दरवाढ होत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क सायकल चालवायला सुरूवात केली आहे. त्याचं झालं असं की, बारामतीत सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी प्रकल्पाची पायाभरणी नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्कउटेन आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. यानिमित्तानं अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना साडे तीन हजार सायकलींचं वाटप करण्यात आले. सायकली पाहिल्यावर नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला आणि खासदार सुप्रिया सुळे यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. दोघींनीही सायकलववरुन राऊण्ड मारली यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला..

डेअरी प्रकल्पाच्या उदघाटनापेक्षा सुप्रिया आणि कॅरोला यांची ही सायकल राऊण्डच शहरात चर्चेचा विषय ठरली. सेंटर फॉर एक्सलन्स डेअरी प्रकल्पाची पायाभरणीसाठी नेदरलँडच्या  उपपंतप्रधान कॅरोला स्कउटेन यांनी आज बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत भूमी पूजन झाले.  या वेळी नेदरलँडचे   आप्पासाहेब पवार सभागृहाच्या आवारात अंगणवाडी महिला आशा कामगारांना सुमारे साडेतीन हजार सायकलिंग वाटपाचा देशातील पहिला उपक्रम राबविण्यात आला नेदरलँडच्या उपपंतप्रधानाच्या हस्ते ह्या सायकलि वाटण्यात आल्या यावेळी नेदरलँडच्या  उपपंतप्रधान या त्यांच्या देशात सायकलिंग करतात त्यामुळे  यांना  सायकल चालविण्याचा मोह आवरला नाही त्यांच्या समवेत  बारामतीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी ही सायकलवर स्वार होत सायकल फेरी मारली. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वानीच एका देशाच्या उपपंतप्रधान सायकल चालवितात हे पाहुन आश्यर्य व्यक्त केले. 

देशाच्या उपपंतप्रधान  व खासदार सुप्रिया सुळे या दोन महिलांनी आम्हीही सायकल चालवू शकतो हे दाखवून दिलं आहे असे म्हणत  शरद पवारांनी आपल्या भाषणात कौतुक केले आहे.