...तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला

शिर्डी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुजय विखे पाटील यांनी  सूचक इशारा दिलाय. सुजय विखेंच्या या सूचक इशाऱ्यांचा रोख कुणाकडे? 

वनिता कांबळे | Updated: Sep 3, 2024, 12:18 AM IST
...तर गाठ माझ्याशी; पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे मैदानात उतरले आणि थेट इशाराच दिला title=

Sujay Vikhe :  गेली अनेक वर्ष नगर जिल्ह्याच्या राजकारणावर विखे कुटुंबाचा प्रभाव आहे. नगरमधील सर्व 12 विधानसभा मतदारसंघांतही मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा प्रभाव असतानाही लोकसभा निवडणुकीत सुजय विखे यांना पराभव झाला होता. सुजय यांच्या पराभवानंतर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नगरच्या राजकारणात दबदबा निर्माण करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांसाठी सध्याचा काळ आव्हानात्मक बनलाय. पराभवाची नामुष्की विसरून सुजय विखे शिर्डी मतदारसंघात जोमानं प्रचार करत आहेत. शिर्डी मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे  यांचा बालेकिल्ला आहे. तरीही  राहता इथल्या एका सभेत सुजय विखे यांनी इशाराच दिलाय. 

सुजय यांच्या इशाऱ्यानंतर त्यांचा रोख कुणाकडे आहे?. लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी सुजय विखे यांनी हा इशारा दिला का असा प्रश्न उपस्थित होतोय.

सुजय विखेंचा रोख कुणाकडे ?

सुजय यांना मुस्लिम बहुल मतदारसंघातून कमी मतदान मिळाल्यानं पराभव झाला. काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण झाला. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. राणे यांनी रामगिरी महाराजांना पाठिंबा देण्याचं आव्हान केलं. तसेच मराठा-ओबीसी वादाचा फटकाही बसला होता.

अहमदनगर जिल्ह्यात थोरात आणि विखे हे मोठे दिग्गज नेते आहेत. नगरच्या राजकारणावर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू असतो. लोकसभा निवडणुकीनंतर आता बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. त्यामुळेच मतांचं ध्रुवीकरण टाळण्यासाठी सुजय विखे यांनी इशारा दिला का असा सवाल उपस्थित होतोय.