पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात धक्कादायक घटना घडलीये. या विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. 

Updated: May 7, 2018, 12:38 PM IST
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याचा हार्ट अॅटॅकने मृत्यू title=

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वसतिगृहात धक्कादायक घटना घडलीये. या विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सकाळी सहा वाजण्याच्या ही दुर्देवी घटना घडली. ऋषिकेश संजय आहेर असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो नगर जिल्ह्यातील घरगाव येथे राहणारा होता. पुणे विद्यापीठात तो एम कॉमच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्याला चक्कर आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. 

 

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. हार्ट अॅटॅकने मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ झालीये.