नवी मुंबई : नवी मुंबईतल्या कोपेरखैरणेमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करताना झोपडपट्टी वासीयांनी पोलिसांवर दगडफेक केलीय. या दगडफेकीत चार पोलीस जखमी झालेत. नवी मुंबईत सिडकोतर्फे कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु होती, यावेळी कारवाई सुरु करण्यापूर्वीच झोपडपट्टीधारकांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. यावेळी पोलीस अधिकारी शिवाजी आवटी गंभीर जखमी झालेत तर आणखी ४ पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झालेत. दरम्यान बंदोबस्तात कारवाई सुरु आहे.... दगडफेक कऱणा-यांना ताब्यात घेण्यात आलंय.