एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी

ST Employees strike : एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालाबाबत सरकारने महत्वाची माहिती दिली आहे.

Updated: Feb 25, 2022, 04:34 PM IST
एसटी विलिनीकरण : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाबाबत मोठी बातमी title=

मुंबई : ST Employees strike : एसटी विलिनीकरणाबाबत (ST Merger) त्रिसदस्यीय समितीने दिलेला अहवाल जाहीर करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. (ST Merger: Big news about the report of the three-member committee)

राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय अहवाल सार्वजनिक करता येणार नाही, असा दावा सरकारी वकील अॅड. काकडे यांनी केला आहे. ST महामंडळाला देखील अहवाल दिलेला नाही. तसेच संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनाही अहवाल दिलेला नाही, असे राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात न्यालयात सांगण्यात आले. न्यायालयाचा आदेश असूनही संपकरी कर्मचारी अजून कामावर रूजू झालेले नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.

एसटी महामंडळाचं (Msrtc Strike) राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलिनीकरणच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी हे गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर आहेत. महामंडळाने कर्मचाऱ्यांचे सेवाज्येष्ठतेनुसार वेतन वाढवून दिले. मात्र त्यानंतरही कर्मचारी हे विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

दरम्यान, सध्यातरी एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण शक्य नसल्याचं, सूत्रांनी त्रिसदस्यीय अहवालातील माहितीनुसार म्हटले आहे. त्याचवेळी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल जाहीर करता येणार नाही, असे म्हटले आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी 12 आठवड्यांच्या मुदतीनंतर आणखी 7 दिवसांची मुदत वाढवून दिली. त्यानुसार आज या अहवालाबाबत मोठी माहिती पुढे आली आहे.