फेमस Tik Tok स्टार लेडी कंडक्टरचं निलंबन, 'हे' आहे कारण

बसमध्ये Tik Tok करण भोवलं, एसटी महामंडळाकडून लेडी कंडक्टरवर निलंबनाई कारवाई

Updated: Oct 2, 2022, 08:03 PM IST
फेमस Tik Tok स्टार लेडी कंडक्टरचं निलंबन, 'हे' आहे कारण

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशीव : फेमस टिक टॉक स्टार आणि एसटी महामंडळात लेडी कंडक्टर (Mangal Sagar Puri)असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने महिला कंडक्टरला मोठा धक्का बसला आहे.    

धाराशिव जिल्ह्यातील मंगल सागर पुरी  (Mangal Sagar Puri) या लेडी कंडक्टरला (Lady Conductor) ऑन ड्यूटी असता स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे चांगलंच महागात पडल आहे. मंगल सागर पुरी या धाराशिव जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर   (Lady Conductor) म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

दरम्यान एसटी महामंडळाचा (ST Corporation) ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा मंगल पुरी (Mangal Sagar Puri) यांनी एक व्हिडिओ बनवला होता.हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा त्यांचा व्हिडिओ तुफान गाजला होता. 

मंगल पुरी (Mangal Sagar Puri) यांच्या या व्हिडिओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला आहे. तसेच अशा व्हिडिओमूळे एसटी महामंडळाची (ST Corporation)  प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी मंगल पुरी (Mangal Sagar Puri) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मंगल पुरी यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने मंगल पुरी यांना मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या (ST Corporation)  या निर्णयाविरोधात संताप देखील व्यक्त होतोय.