भिवंडीत विद्यार्थिनींच्या मोबाईलमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका

 तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

Updated: Mar 20, 2019, 02:27 PM IST
भिवंडीत विद्यार्थिनींच्या मोबाईलमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका  title=

भिवंडी : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत. आज या विद्यार्थ्यांचा समाजशास्त्र विषयाची परीक्षा होती. राज्यभरात अत्यंत शिस्तीत ही परीक्षा सुरु असते. कॉपीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी भरारी पथक सर्व केंद्रांवर पाळत ठेवत असते. पण भिवंडी तालुक्यातील एका शाळेत शिस्तीला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. या शाळेत परीक्षार्थी म्हणून आलेल्या तीन विद्यार्थीनींना कॉपी करताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. 

भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील शेतकरी उन्नती मंडळाच्या परशराम धोंडु टावरे विद्यालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेपरला सुरूवात झाली तरी तीन विद्यार्थीनी शाळेच्या बाहेर घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. या तीन विद्यार्थीनी रिक्षात बसलेल्या आढळल्या. पेपरला सुरुवात झाली तरी परिक्षा केंद्रात येत नसल्याने शिक्षिका विद्या पाटील यांना त्यांच्यावर संशय आला. शिक्षिका पाटील यांनी त्या संशयित विद्यार्थिनींची तपासणी  केली असता त्यांच्या मोबाईल मध्ये टॉपर्स ग्रूप या नावाने प्रश्नपत्रिका आढळून आली. 

परिक्षा सुरु झाल्यावर तीन विद्यार्थिनी वर्गात आल्या. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा तोच प्रकार आढळून आला .
 राहनाळ येथील होली मेरी काँन्व्हेंट शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या या विद्यार्थीनी आहेत. शाळेचे संस्थाध्यक्ष राजू पाटील यांनी शाळेने हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.