नागपूर : १० वी, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षेत आणखी एक अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या परीक्षांसाठी इमारती देण्यास शिक्षण संस्था महामंडाळानं नकार दिलाय. नागपूर आणि अमरावती विभागातल्या सर्व जिल्ह्यांच्या सशिक्षण संस्था संचालक मंडळातील पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत शाळांच्या इमारती परीक्षांसाठी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यात सुमारे ६४ हजार अनुदानित शाळा आहेत. त्यातल्या बहुतांशा शाळा आपल्यासोबत असल्याचा दावाही महामंडळानं केलाय. विविध मागण्यांसाठी महामंडळानं राज्य सरकारविरोधात असहकार पुकारलाय.