SSC Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांचे असे होणार मूल्यमापन! मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची भावना उच्च न्यायालयाने व्यक्त केली होती, त्यानंतरही दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Updated: May 27, 2021, 07:28 PM IST
 SSC Exam | दहावीच्या विद्यार्थ्यांचे असे होणार मूल्यमापन! मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव सादर  title=
representative image

दीपक भातूसे, मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची भावना उच्च न्यायालयाने व्यक्त केली होती, त्यानंतरही दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मूल्यमापनासाठी नववी आणि दहावीतील आतापर्यंत झालेल्या शालेय स्तरावरील परीक्षांच्या निकालाचा आधार घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली. परीक्षांबाबत अंतिम प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यास शिक्षणमंत्री 1-2 दिवसात त्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

असे होणार मूल्यमापन

शालेय स्तरावर झालेल्या नववीच्या परीक्षा तसेच दहावीच्या अंतिम परीक्षा वगळता  झालेल्या परीक्षांचं मुल्यमापन करण्याचा प्रस्ताव  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.