कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या धावणार

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुट्टीसाठी खास 60 गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Updated: Mar 22, 2019, 09:47 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर  उन्हाळी सुट्टीसाठी विशेष गाड्या धावणार title=

मुंबई : उन्हाळी सुट्टीसाठी मध्य रेल्वेच्या 60 विशेष रेल्वे पनवेल-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी दरम्यान धावणार विशेष रेल्वे सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या आणि पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासने 60 विशेष रेल्वे चालविण्यचा निर्णय घेतलेला आहे. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडी दरम्यान या स्पेशल गाड्या धावणार आहेत. या गाड्यांचे तिकिट दर विशेष रेल्वे प्रमाणे आकारण्यात येणार आहे.

पनवेल ते सावंतवाडी विशेष रेल्वेच्या चाळीस फेऱ्या धावणार असून  01413  विशेष रेल्वे  6 एप्रिल ते 9 जून दरम्यान दर शनिवार,रविवार सकाळी 8.15 वाजता सुटुन त्याच दिवशी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01414 विशेष रेल्वे  5 एप्रिल ते 8 जून दरम्यान दर शुक्रवार,शनिवारी रात्री 8.30 वाजता सुटुन पनवेलला दुसऱ्या दिवशी सकाळी 7.20  वाजता पोहोचणार आहे.  या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर,रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली,सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. 

तर  पुणे-सावंतवाडी  विशेष रेल्वेच्या 20 फेऱ्या असून 01411  विशेष रेल्वे  5 एप्रिल ते 7  जून दरम्यान दर शुक्रवारी पहाटे 4. 55 वाजता सुटुन त्याच दिवसी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 01412  स्पेशल रेल्वे 7 एप्रिल ते 9 जून दरम्यान दर रविवारी रात्री 8. 30 वाजता  सुटुन पुण्याला दुसऱ्या दिवशी दुपारी 12.25 वाजता पोहोचणार आहे. या रेल्वेला लोणावळा,पनवेल ,रोहा,माणगाव,खेड,चिपळूण,सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांना एसी चेअर कारचे 2, सेकण्ड सीटींगचे 11 कोच असून या विशेष गाडयांचे 25 मार्चपासून  आयआरसीटीसी बेवसाईटवर आरक्षण सुरु होणार आहे.