गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस

आता कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला द्या अनोख्या पद्धतीत मेसेजेस, त्यासाठी ही बातमी वाचा  

Updated: Aug 27, 2022, 03:30 PM IST
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मेसेजेस title=

मुंबई : अखेर दोन वर्षांनंतर मोठ्या आनंदात गणेश चतुर्थी उत्सव साजरा करता येणार आहे. गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

गणरायाचे आगमन होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्वचजण व्हॉट्सअॅप, फेसबूकवर विविध शुभेच्छा देणारे मेसेजेस पाठवत असतात. चला तर मग पाहूयात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस...

गणपतीची मूर्ती पाठवत आहे
फॉरवर्ड नाही करायची मोबाईलमध्ये पूजा करुन दर्शन घ्यायचं
गणपती बाप्पा मोरया  

 गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना शुभेच्छा…
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
॥गणपती बाप्पा मोरया॥

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला...
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी...
सर्व गणेश भक्तांना
"गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा"

वक्रतुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में देव,
सर्व कार्येषु सर्वदा…
हॅप्पी गणेश चतुर्थी!

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो...
हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया...
कुणी म्हणे तुज "ओंकारा"
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज "विघ्नहर्ता"
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज "एकदंता"
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज "गणपती"
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज "वक्रतुंड"
शक्तिमान तुझे सोंड...
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!

तुमच्या आयुष्यातील आनंद 
त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा
अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात
आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणि
आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत…
आपणास व आपल्या परिवारास
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा…!

ज्यांच्या घरी बाप्पा आहेत त्यांना विशेष सूचना...
मोदक आम्हाला आवडतात तरी ते आमच्यापर्यंत पोहोचतील याची व्यवस्था करावी...
बाप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा…!