अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर मनपातील बसच्या ताफ्यात महिलांसाठी 'तेजस्वीनी' इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. खास महिलांसाठी ही गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची बस लवकरच सेवेत हजर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेतर्गंत, नागपूर मनपाच्या 'आपली बस'च्या ताफ्यातही खास महिलांसाठी पाच तेजस्वीनी बससेवा सुरु होणार आहे. या सर्व इलेक्ट्रिक बस असणार आहे. या बसने प्रदुषणमुक्त प्रवास करता येणार आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने या बसकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. महिलांसाठी आवश्यक सुविधाही या बसमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
येत्या ऑगस्टपर्यंत या तेजस्वीनी बस नागपुरच्या रस्तावर धावतना दिसतील. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या या बसच्या चालकही महिलाच असणार असल्याचे मनपा परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले. शहीद जवनांच्या कुटुंबातील महिलांना या बसने निशुल्क प्रवास करता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हरिहर मंदिरजवळ या तेजस्विनी बसचे चार्जिंग स्टेशन ठेवण्यात येणार आहे.