पुणे : पुण्यातल्या शनिवार पेठेत दाम्पत्याची हत्या करण्यात आली आहे. आई-वडिलांची गळा चिरुन ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शनिवार पेठेतील पहाटेची ही घटना आहे. हत्येचं कारण अजून अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी असून मुलगा पराग क्षिरसागरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पराग शिक्षरसागर यानेच आई वडीलांचा खून केल्याची माहिती समोर येते आहे.
हाताची नस कापून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील परागने केला. पण यात तो वाचला आहे. परागला जुळा भाऊ आहे. तो देखील घटनेच्या वेळी घरात होता. प्रकाश शिक्षरसागर असं वडिलांचे नाव आहे. आई-वडील दोघेही नोकरी करत होते. पण ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली याबाबत अजून कोणताही माहिती समोर आली आहे.
बातमीचा व्हिडिओ