प्रणिती शिंदेंनी 'त्या' प्रशासकीय अधिकाऱ्याला भरला सज्जड दम

सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी हागणदारी मुक्त अभियान अंतर्गत उघड्यावर शौचाला जाणा-या महिलेबरोबर काढलेल्या फोटो सेशनचा आमदार प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.

Updated: Oct 8, 2017, 11:53 PM IST
प्रणिती शिंदेंनी 'त्या' प्रशासकीय अधिकाऱ्याला भरला सज्जड दम title=

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांनी हागणदारी मुक्त अभियान अंतर्गत उघड्यावर शौचाला जाणा-या महिलेबरोबर काढलेल्या फोटो सेशनचा आमदार प्रणिती शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला.

सीईओवर निलंबनाची कारवाई झाली नाही तर महिला कायदा हातात घेतील असा सज्जड दम त्यांनी भरला. महिलांचा अपमान करण्याचा अधिकार या प्रशासकीय अधिका-याला कुणी दिला असा सवाल करीत महिलेचा अपमान करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी केली.

गावात उघड्यावर शौचास बसलेल्या महिलांचा सत्कार केला म्हणून प्रसार माध्यमांतून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे.