चंदू चव्हाण यांना लष्कराची नोकरी सोडायची इच्छा

चंदू चव्हाण यांना लष्कराची नोकरी सोडायची इच्छा  title=

मुंबई : सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांनी आपली आर्मीतील नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याकरता त्यांनी वरिष्ठांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. 18 महिन्यापूर्वी जवान चंदू चव्हाण यांनी पाकिस्तानची सीमा रेषा ओलांडली होती आणि त्याचवेळी भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. 

24 वर्षीय जवान चंदू चव्हाण हे मुळचे धुळ्याचे आहे. सध्या ते पुण्यातील मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. 29 सप्टेंबर 2016 रोजी चव्हाण यांनी सर्जिकल स्ट्राईकच्यावेळी चुकून एलओसी पार केली होती. त्यानंतर चार महिने चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या कैदेत होते. त्यावेळी पाकिस्तानने त्यांचे भरपूर हाल केले होतं. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली पण त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले शिवाय त्यांना शिक्षाही सुनावण्यात आली. 

पत्रात काय म्हणाले चंदू चव्हाण

'मी गेल्या 20 दिवसांपासून मिलिट्री हॉस्पिटलच्या मानोसपचार विभागात आहे. मला नोकरीतून मुक्त करावं, यासाठी मी तीन दिवसांआधी वरिष्ठांना पत्र पाठवलं आहे. काही काळाआधी माझ्याबरोबर जे झालं, ते मला भारी पडलं आहे. लष्कराच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर मला सामान्य जीवन जगायचं आहे', असं चंदू चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.